Rabbi aanudan : नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितींमुळे जिल्हा प्रशासनाच्या अंतिम संकलित अहवालानुसार एकूण सात लाख २७ हजार ९३२ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.
या बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांनुसार ७२७ कोटी ९३ लाख २४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार, असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
राज्य शासनाने अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १८ हजार ५०० रुपये नुकसान भरपाई मंजूर केली होती. यातील प्रति हेक्टर साठेआठ हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केल्यानंतर शेतकऱ्यांना रब्बी पेरणीच्या निविष्ठासाठी म्हणून हेक्टरी १० हजार प्रमाणे मदत देण्याचे जाहीर केले होते. यानुसार शासनाने तीन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर दहा हजार रुपये नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर केले.
यानुसार नांदेड जिल्ह्यातील सात लाख २७ हजार ९३२ हेक्टर नुकसान झालेल्यांना भरपाईसाठी ७२७ कोटी ९३ लाख २४ हजार रुपये मंजूर केले आहे. नांदेडमध्ये जून महिन्यात प्रारंभी ४,७९० हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले होते. परंतु जुलै ते सप्टेंबर दरम्यान सततच्या पावसामुळे नुकसान क्षेत्र झपाट्याने वाढले. एकूण ६.४८ लाख हेक्टर क्षेत्रावर परिणाम झाला होता. यासोबतच अतिरिक्त बाधित क्षेत्र ४२ हजार हेक्टर नोंदले गेले आहे. एकूण बाधित क्षेत्र ७.२७ लाख हेक्टर जिल्हा प्रशासनाने संबंधित तालुक्यांच्या अहवालावर आधारित हा अंतिम आकडा सादर केला आहे. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना शासन नियमांनुसार मदत वितरित करण्यात येणार आहे.
मुखेडला सर्वाधिक फटका
मुखेड तालुक्यात सर्वाधीक ७४,६८९ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी ७४ कोटी ६८ लाखांचा निधी मिळणार आहे. तर हदगाव तालुक्यात ६९,८१३ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यासाठी ६९ कोटी ८१ लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे. त्यानंतर किनवटमध्ये ६८,५९५ हेक्टर, लोहा ६८,४९५ हेक्टर व बिलोली तालुक्यात ४४,६०१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. इतर प्रमुख तालुक्यांमध्ये धर्माबाद २८,१५८ हेक्टर, हिमायतनगर ३५,३६९ हेक्टर, देगलूर ५३,७०१ हेक्टर, तर भोकर तालुक्यात ४२,५२५ हेक्टर क्षेत्र बाधित असल्याचे अहवालात नमूद आहे.
तालुकानिहाय बाधित शेतकरी, बाधित क्षेत्र मंजूर अपेक्षित निधी
तालुका बाधित शेतकरी बाधित क्षेत्र (हे.) अपेक्षित निधी
अर्धापूर २९,१४५ २६,३६९ २६,३६,९०,०००
भोकर ४९,३६१ ४२,५२५ ४२,५२,५०,०००
बिलोली ५९,२३२ ४४,६०१ ४४,६०,१२,७००
देगलूर ५७,८५० ५३,७०१ ५३,७०,१०,३००
धर्माबाद २४,९५६ २८,१५८ २८,१५,८०,०००
हदगाव ७५,००७ ६९,८१३ ६९,८१,३२,१००
हिमायतनगर ३४,९०६ ३५,३६९ ३५,३६,९२,६००
कंधार ६७,५३३ ६३,१२६ ६३,१२,६३,४००
किनवट ५१,४८८ ६८,५५९ ६८,५५,९०,०००
लोहा ८१,११५ ६८,४९५ ६८,४९,५६,०००
माहूर २५,७१८ २८,०२३ २८,०२,३०,०००
मुदखेड २५,४५० २३,१९५ २३,१९,५००००
मुखेड ७३,९२६ ७४,६८९ ७४,६८,९६,०००
नायगाव ५६,५५१ ४५,०८७ ४५,०८,७१,१००
नांदेड ३४,०९५ २४,०३९ २४,०३,९९,८००
उमरी ३३,९९४ ३२,१८० ३२,१८,००,०००
एकूण ७,८०,३२७ ७,२७,९३२ ७२७,९३,२४,०००
एकूण बाधित शेतकरी ७,८०,३२७
बाधित क्षेत्र (०-२ हे.) ४,७९०.७८ हेक्टर
बाधित क्षेत्र (२-३ हे.) शून्य हेक्टर
जून ते सप्टेंबरदरम्यान बाधित क्षेत्र ७,२७,९३२.४ हेक्टर
अपेक्षित निधी ७२७,९३,२४,०००