पी एम किसान चा 21 वा हप्ता या तारखेला येनार खात्यात…नवीन अपडेट
पी एम किसान चा 21 वा हप्ता या तारखेला येनार खात्यात…नवीन अपडेट ; पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या २१ व्या हप्त्याबद्दल अनेक शेतकरी विचारणा करत आहेत की तो नेमका कधी जमा होणार. या संदर्भात, एक गंभीर मुद्दा उपस्थित झाला आहे की केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत दुजाभाव केला आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रासह पंजाब, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये मोठे नुकसान झाले होते.
मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करत, या चार राज्यांमधील सुमारे ३५ लाख ५० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २१ वा हप्ता जमा केला. महाराष्ट्राला मात्र तेव्हा वगळण्यात आले, तसेच यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या (NDRF) मदतीमध्येही महाराष्ट्रासोबत सातत्याने भेदभाव केला जात असल्याचा आक्षेप आहे.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसानचा २१ वा हप्ता कधी जमा होणार, यावर आता केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी माहिती दिली आहे. बिहारमधील निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे या हप्त्याच्या वितरणाला अडथळा येत होता. ही आचारसंहिता संपल्यानंतर, उर्वरित सर्व राज्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता जमा करण्यात येईल. खऱ्या अर्थाने, शेतकरी संकटात असताना दिवाळीच्या दरम्यान हा हप्ता येणे अपेक्षित होते, परंतु त्याला मोठा विलंब झाला आहे. मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात २१ व्या हप्त्याचे २००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीवरही काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. उदा. एका कुटुंबामध्ये केवळ एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जातो, तसेच २०१९ नंतर ज्यांची खातेफोड झाली आहे, अशा नवीन शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीचा लाभ मिळत नाही. सरकारने आपल्या धोरणांमध्ये बदल करून, नवीन शेतकऱ्यांचाही यात समावेश करणे आवश्यक आहे.
मात्र, याही पुढे जाऊन, शेतकऱ्यांची प्रमुख मागणी अशी आहे की, त्यांना पीएम किसान किंवा नमो शेतकरी अशा अनुदानाची गरज नाही. शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त आणि योग्य भाव मिळेल, अशी धोरणे जर सरकारने आखली, तर शेतकऱ्याला या ‘भीकमाग’ योजनांवर अवलंबून राहावे लागणार नाही.