सोयाबीन 8000 पार ; वाशिम मध्ये सोयाबीन 8000 पार, एवढा भाव कसा मिळाला….
सोयाबीन 8000 पार ; नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या मोठ्या प्रमाणावर बाजारात सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. उशीराने मळणी केलेल्या तसेच मळणी करून विक्रीसाठी थांबलेले शेतकरी आता सोयाबीन मार्केट मध्ये नेत आहेत. ओलावा कमी असलेल्या सोयाबीन ला 4500 पासून 5000 रुपयापर्यंत सरासरी दर मिळत आहे.
दि. 07/ नोव्हेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम येथिल लिलावाच्या काही पावत्या शोशल मिडिया वर वायरल झाल्या असून शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दि. 07/ नोव्हेंबर रोजी वाशिम मध्ये 8000 रुपये पेक्षा अधिक दर मिळाल्याच्या पावत्या शोशल मिडिया वर पहायला मिळाल्या होत्या. याबाबत प्रत्यक्ष बाजार समितीकडे विचारणा केली असता असे समजले की उन्नती 1135 बिजवाई सोयाबीन (बियाणे साठी वापरणार) ला 8000 रुपये दरम्यान दर मिळाल्याचे स्पष्ट झाले.

सध्या सोयाबीन 4500 ते 5200 पर्यंत सोयाबीनची क्वालीटि पाहून दर मिळत आहे. दररोजचे बाजारभाव, हवामान अंदाज, शासकीय योजना आणि शेतीविषयक इतर महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या ग्रुप मध्ये सहभागी व्हा धन्यवाद…